Jal Jeevan Mission : अलोरे पाणी योजनेचे काम सुरू करण्यास मुदत

चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथील जलजीवनअंतर्गत निधी मंजूर असेलेले पाणी योजनेचे काम गेले अनेक दिवस बंद ठेवण्यात आले आहे. ते काम ५ ऑक्टोबरपर्यंत सुरू न केल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपअभियंता शैलेश बुटाला यांनी दिले आहे.

अलोरे जलजीवन सुधारित पाणी योजनेबाबत ग्रामपंचायत कार्यालयात पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त उपअभियंता बुटाला यांनी ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. वाडीनिहाय त्यांनी आढावा घेतला. गेल्या पावणेदोन वर्षांत कोट्यवधीची बिले प्रलंबित असल्याचे संबंधितांकडून अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. ११ ग्रामपंचायत सदस्यापैकी चार सदस्यांमध्ये सरपंच सिद्धी चव्हाण माजी सरपंच मानसी चव्हाण, माजी उपसरपंच प्रमोद महाजन, तुषार चव्हाण उपस्थित होते. प्रीतम आंब्रे, वसंत चिपळूणकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. ग्रामसेवक अमर ऐवळे यांनी प्रोसिडिंग केले. योजनेच्या कामाविषयाची माहिती वेळोवेळी ग्रामपंचायतीला दिली जाईल, असे बुटाला यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 18/Sep/2025