Ratnagiri: पालीच्या पैलवानांचा डंका! सहा कुस्तीपटूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी, (प्रतिनिधी): मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पालीच्या सहा कुस्तीपटूंनी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. सोमवारी, १५ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे झालेल्या या स्पर्धेत पाली हायस्कूलच्या सहाही विद्यार्थ्यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्णपदक पटकावून १०० टक्के यशाची नोंद केली. या चमकदार कामगिरीमुळे त्यांची आता विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

१४, १७ आणि १९ वर्षांखालील गटांमधील या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सहा कुस्तीपटूंनी दमदार प्रदर्शन करत यश मिळवले आहे. हे सर्व खेळाडू आता ३० सप्टेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग क्रीडा संकुलात होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

यशस्वी कुस्तीपटू:

  • १४ वर्षांखालील गट:
  • अथर्व अजित गराटे (५२ किलो वजनी गट)
  • वरद सुभाष धाडवे (५७ किलो वजनी गट)
  • १७ वर्षांखालील गट:
  • दुर्वांक दिनेश नागले (११० किलो वजनी गट)
  • १९ वर्षांखालील गट:
  • वेदांत यशवंत नागले (६१ किलो वजनी गट)
  • गौरव नंदकुमार नागले (७९ किलो वजनी गट)
  • सोहम सुधर्म सावंतदेसाई (१२५ किलो वजनी गट)
    या सर्व यशस्वी कुस्तीपटूंचे अभिनंदन! आता विभागीय स्पर्धेतही ते अशीच उत्कृष्ट कामगिरी करतील अशी आशा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 18-09-2025