Sakharpa: चाफवली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रकाश चाळके

साखरपा : चाफवली (ता. संगमेश्वर) गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश चाळके यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

सलग सातव्या वर्षी चाळके यांची निवड केली आहे. ते गेली अनेक वर्षे पत्रकारिता करत आहेत. त्यांनी त्या माध्यमातून गावातील अनेक समस्यांना वाचा फोडून त्या निराकरण कारण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.

तसेच कोरोना काळात त्यांनी गावासाठी मोठी सामाजिक कामे केली आहेत तसेच गेली सहा वर्षे त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून गावाने त्यांची सातव्या वर्षी निवड केली आहे. या वेळी सरपंच आरोही रावण, उपसरपंच विजय घुमे, पोलिसपाटील विजय चाळके, ग्रामसेवक घुमे, तलाठी श्रीहरी लांब उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 18-09-2025