रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे एप्लॉयएबीलिटी स्किल हा विषय शिकविण्यासाठी आणि आरेखक यांत्रिकी व वीजतंत्री या व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी २८ दिवसांच्या कालावधीसाठी घड्याळी तासिका तत्त्वावर पदभरती करण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज व शैक्षणिक /अनुभव प्रमाणपत्रांच्या छायांकीत प्रतीसह २० सप्टेंबरपर्यंत संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्र. प्राचार्य शशिकांत कोतवडेकर यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांची लेखी व बौध्दिक, कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. पात्र मनुष्यबळाची निवड शासनाने विहित केलेल्या शैक्षणिक अर्हता, अनुभव व कौशल्य यानुसार करण्यात येईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 18/Sep/2025













