राजापूर: राजापूर नगरपरिषदेच्या वतीने बुधवारी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय यांचे द्वारे स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव व कर प्रशासकीय अधिकारी प्रताप ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यकमाची सुरूवात वृक्षाला पाणी घालून करण्यात आली. स्वच्छता हि सेवा या उपक्रमांतपर्गत नगर परिषदेच्या वतीने दि. १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याप्रसंगी कर प्रशासकीय अधिकारी श्री प्रताप ढोणे यांनी उपस्थितितांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. आपले शहर स्वच्छ ठेवायचे असेल तर न.प. अधिकारी, कर्मचारी हे प्रयत्नशील असतातच परंतु प्रत्येक नागरिकांची सुद्धा तितकीच नैतिक जबाबदारी आहे, तसेच सर्वांनी या उपक्रमात भाग घेऊन स्वच्छतेस हातभार लावावा असे प्रबोधन करण्यात आले.
यानंतर राजापूर नगरपरिषद सफाई कर्मचारी यांना कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता श्रीमती सुप्रिया पोतदार यांनी स्वच्छतेची शपथ उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत घेतली. राजापूर शहर हद्दीतील गोखले कन्या शाळा व परिसर येथे स्वच्छतेचा उपक्रम घेण्यात आला तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले. यावेळी न.प.स्वच्छता दूत व जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले सुहास काडगे यांना पुष्पगुच्छ व पर्यावरण पुरक भेटवस्तु देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरीक्षक अमित पोवार, संदेश जाधव, दिवाकर खडपे, विश्वजीत जाधव व ऋतुजा जड्यार यांनी विशेष परिश्रम घेतले. राजापूर नगर परिषदेचे स्वच्छता दूत श्री महेश शिवलकर यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 18-09-2025













