खेड : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बिजघर नंबर १ शाळेत विशेष ग्रामसभा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बिजघर ग्रामपंचायतीच्या सरपंच शुभांगी भोसले यांनी भूषवले.
या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे शिक्षक शैलेश पराडकर यांच्या स्वागतपर शब्दांनी झाली. ग्रामपंचायत अधिकारी रमेश निकम यांनी प्रास्ताविक करत ग्रामसभेचे महत्त्व अधोरेखित केले. विशेष ग्रामसभेसाठी नियुक्त नोडल अधिकारी व तिसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र जाधव यांनी उपस्थितांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. गावचे तलाठी सुशील भोसले यांनी “सेवा पंधरवडा” टप्पा एक, दोन व तीन याबाबत सविस्तर माहिती देत ग्रामस्थांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
या विशेष ग्रामसभेला उपसरपंच सखाराम जाधव, पोलीस पाटील प्राची मर्चेंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश विचारे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय येरुणकर, माजी उपसरपंच रामकृष्ण भरणे, माजी सरपंच काशिनाथ शिगण यांच्यासह महेंद्र राणे, वामन कुदळे, कृष्णा बैंकर, सीताराम सालप, मंगेश मर्चेंडे, शरद मर्चेंडे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रभाकर सुर्वे, विश्वनाथ शिगण, नारायण शिरकर, सरला मावळी, अनुराधा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामसभेत गावाच्या विकास आराखड्यांवर चर्चा करण्यात आली तसेच सरकारी योजना प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने सूचनांची देवाणघेवाण झाली. या कार्यक्रमाच्या शेवटी संदीप घाणेकर यांनी आभार मानून सभेचा समारोप केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 18/Sep/2025













