मंडणगड : दापोली तालुका विधी सेवा समितीअंतर्गत मंडणगडातील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये वादपूर्व ७१९ तसेच प्रलंबित असणारी ८४ प्रकरणे ठेवण्यात आली होती.
त्यापैकी प्रलंबित ८ व वादपूर्व ६० प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून एकूण १०,१८,३५९ इतकी रक्कम वसूल करण्यात आली. लोकअदालतीमध्ये दिवाणी न्यायाधीश क. स्तर ओ. सी. जोशी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच अॅड. ए. ए. बैकर यांनी पॅनल विधिज्ञ म्हणून काम पाहिले. सहायक अधीक्षक के. ए. पेढांबकर, वरिष्ठ लिपिक आर. सी. मोहिते व एस. डी. चिले, लघुलेखक ए. जे. सागवेकर, कनिष्ठ लिपिक वाय. बी. खोपकर, ओ. आर. झर्वे यांनी लोकअदालतीचे या कामकाज पाहिले. तसेच लोकअदालतीसाठी मंडणगड वकील बार संघटनेने सहकार्य केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 18/Sep/2025













