खेड : शहरातील कुवारसाई गावातील मनोज राजाराम चव्हाण (५२) या शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना अचानक मृत्यू झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास मनोज चव्हाण आपल्या शेतात काम करत असताना त्यांना अचानक चक्कर आली व ते जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांना जोरजोराने श्वास लागल्याने नातेवाईकांनी तातडीने खाजसगी रिक्षाने त्यांना मुल्ला हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे हलवण्याचा सल्ला दिला. यानंतर दुपारी त्यांना उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून दुपारी २ वाजता त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कुवारसाई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 19/Sep/2025












