जालगाव : दापोली तालुक्यातील वनौशी, वाणेवाडी सोंडेघर येथून अज्ञात इसमाने सुमारे एक लाख ४० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शिवराम बाबुराव पाटणे (वय ८३) सैन्यातून निवृत्त, राहणार वनौशी यांच्या घरातून २६ मे २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत अज्ञाताने घरातील उत्तर दिशेला असणाऱ्या गोदरेज कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने यात सुमारे ८० हजार रुपये किमतीचे गळ्यातील २ तोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मी हार, ४० हजारांचे कानातील सोन्याच्या पट्ट्या, २० हजार रुपये किमतीचे अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, असे सुमारे १ लाख ४० हजारांचा ऐवज अज्ञात इसमाने चोरून नेला.
याची फिर्याद दापोली पोलिस ठाण्यात १७ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आली. दापोली पोलिस ठाण्यात याबाबत अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 19/Sep/2025














