पावस : तालुक्यातील गणेशगुळे येथे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत एक दिवस, एक तास, एक साथ गावातील समुद्रकिनारा आणि परिसर स्वच्छ करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थ, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका अशा सुमारे शंभर लोकांनी श्रमदान केले. प्रभारी सरपंच प्रसाद सुनील तोडणकर यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. प्रत्येकाने परिसरातील स्वच्छता अभियानापुरता मर्यादित न ठेवता त्याची दररोज अंमलबजावणी करून आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे.
यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, अश्विनी साळुंखे, सुषमा शिंदे, अश्विनी जोशी, रवी तेरवणकर, मंगला तोडणकर, रजनी कच्चवे, शिल्पा मयेकर, संतोष लाड, विक्रम गुरव, मुख्याध्यापक, शिक्षक, सहाय्यक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर राऊत, आरोग्यसेवक संतोष डांगे, विनीत सातोपे आदी सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 26-09-2025













