Ratnagiri: रत्नागिरी बसस्थानकावर मोफत पुस्तक वाचनालय!

रत्नागिरी : प्रवाशी गावी जाण्यासाठी, कामाला जाण्यासाठी एसटी बसस्थानकावर थांबलेला असतो. मात्र एसटी बस वेळेवर न आल्यास तासनतास एसटी वाट पहावी लागते. त्यावर पर्याय म्हणून आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्यावतीने रत्नागिरीसह महामंडळाच्या 75 बसस्थानकावर मोफत पुस्तक वाचनालय सुरू करण्यात येणार आहे.

त्यामुळे मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा प्रवाशांना मराठी वृत्तपत्र,कथासंग्रह, स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तके उपलब्ध असणार आहे.विशेष म्हणजे स्थानकातील कर्मचार्‍यांकडे नोंद करून पुस्तके घरी नेवून वाचता ही येणार आहे. त्यामुळे त्यांचा वेळ सत्कार्णी लागणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील 75 बसस्थानकात पुस्तक वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची घोषणा ही सरनाईक यांनी काहीदिवसापूर्वी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटीची वाट पाहता पाहता मोफत पुस्तके वाचण्यास मिळणार असून आपला वेळ सत्कार्णी लागणार आहे. मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा मोफत पुस्तक वाचनालय ठेवल्यामुळे वाचनप्रेमींना एक पर्वणीच मिळणार आहे. यामुळे प्रवाशांच्या ज्ञानात भर पडणार आहे. विद्यार्थ्यांना ही अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षेचे पुस्तके तसेच विविध पुस्तके असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही फायदा होणार आहे.

प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी मोफत पुस्तक वाचनालय सुरू करण्याची घोषणा झाली आहे. रत्नागिरी विभागातील विविध आगारात मोफत पुस्तक वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरीकरांना आता बसस्थानकावर विविध मराठी वृत्तपत्र, विविध पुस्तके वाचण्यास मिळणार आहे.त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे.ओंकार साठे, रत्नागिरी एसटी बसस्थानकावर पुस्तक वाचनालय सुरू करण्याचा एसटी महामंडळाने जो निर्णय घेतला आहे तो स्वागताहार्य आहे. बसस्थानकावर एसटीची वाट पाहताना कंटाळा येतो, मोबाईल किती तास बघायचा. पुस्तक वाचनालय सुरू केल्यास वृत्तपत्र, पुस्तके वाचून ज्ञानात भर पडले, वाचनाची चळवळ निर्माण होईल.विशेष तरूणाईबरोबर सर्वांना वाचनाची आवड होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 01-10-2025