रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील आंबा बागेत अज्ञात प्रौढ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही घटना १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.१५ वा. सुमारास निदर्शनास आली. याबाबत श्रीकांत जठार यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, त्यांची हातखंबा येथे आंबा बाग आहे. त्या बागेत कामाला असलेला गुरखा हा बुधवारी सकाळी त्यांना फोन करून आपल्या बागेत एक अज्ञात प्रौढ आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती दिली. त्यानंतर श्रीकांत जठार यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. मृताच्या हातावर १८-८-२३ आणि ‘मिय यू डॅड’ असा टॅटू असून याबाबत तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:49 AM 02/Oct/2025














