Ratnagiri : शिरगाव-तिवंडेवाडी येथे घराचे कुलूप विनापरवाना तोडून घरात वास्तव्य

रत्नागिरी : फिर्यादीकडे घराचा कायदेशीर ताबा असतानाही त्यांच्या परवानगीशिवाय घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी शिरगाव-तिवंडेवाडी येथे घडली.

नीलेश मनोहर ठिक (रा. शिरगाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात तानाजी गुंडा मंडले (वय ४२, सध्या रा. शिवगंगा अपार्टमेंट परटवणे, मूळ रा. सांगली) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:56 AM 02/Oct/2025