नाटे : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढीव गस्तीदरम्यान नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. नाटे-जैतापूर सागरी महामार्गावर नाटे परिसरात विनापरवाना ऑटो रिक्षामधून देशी व विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी धाड टाकून संशयितांना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी (लांजा) सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय पाटील, किरण जाधव, सचिन आडबे, सागर गुरव आदींचा समावेश होता. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, (१) गणेश रमेश सुर्वे, तुळसुंदे व (२) नीलेश प्रभाकर आडिवरेकर, मिठगवणे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 02/Oct/2025














