लांजा : घरात कुणी नसल्याचा फायदा घेत घराच्या कपाटाच्या लॉकरमध्ये असलेले ५ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना लांजा तालुक्यातील आंजणारी शिखरेवाडी येथे उघडकीस आली. ही चोरीची घटना दि. १२ मे ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडली. याबाबतची तक्रार लांजा पोलीस ठण्यात दाखल करण्यात आली आहे.
आंजणारी शिखरेवाडी येथील शुभांगी यशवंत शिखरे (वय ४५, राहणार आंजणारी शिखरेवाडी) यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुभांगी शिखरे यांनी आपल्या घरामध्ये असलेल्या कपाटाच्या लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. त्यांनी बुधवारी १ ऑक्टोबर रोजी लांजा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 02/Oct/2025














