गुहागर : चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाटपन्हाळे उपकेंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले. तसेच तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमात चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला वाडकर, आरे उपकेंद्राचे डॉ. अक्षय सानप, परिचारिका माधुरी घावट, आरोग्य सहायक सिद्धार्थ भालेराव, कीटक समाहारक पर्यवेक्षक वाडकर, नथुराम जानवळकर, पंढरीनाथ पप्पूलवार, वरवेली उपकेंद्राचे डॉ. गायकवाड यांच्यासह सर्व आरोग्य सेविका, आरोग्यसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविका, बचतगट पर्यवेक्षक आदी सहभागी झाले होते. या सर्वांनी उपस्थित महिलांची रक्त तपासणी, मधुमेह, रक्तदाब, नेत्र, दंतरोग, स्तन, गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसुतीपूर्व तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकसेल आजार व रक्तक्षय तपासणी करून तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गटविकास अधिकारी शेखर भिलारे, पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, ग्रा. पं. सदस्य, नेत्रतज्ज्ञ डॉ. जोशी, बालरोगतज्ज रूपाली कुष्टे, आरजीपीपीएलचे डॉ. दीपक जाधव, वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम, वशिष्ठी क्लिनिकच्या डॉ. मुग्धा नार्वेकर यांनी भेट दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 02/Oct/2025














