Solapur Mahapur : नवसाचा चिपळूणचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात!

चिपळूण : शहरातील प्रसिद्ध “नवसाचा चिपळूणचा राजा” गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत मराठवाड्यातील पुरग्रस्त बांधवांसाठी मायेचा ओलावा देत एक मदतीचा हात पुढे केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी गावातील सुमारे ३५० कुटुंबांसाठी मंडळाच्या वतीने ६०० उत्तम दर्जाचे टॉवेल्स वितरित करण्यात आले.

मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे आणि नद्यांना आलेल्या महापुरामुळे ८०० ते ९०० गावांचे नुकसान झाले असून, गावातील नागरिक बेघर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी “चला देऊ मदतीचा हात” असे आवाहन करत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 03/Oct/2025