रत्नागिरी : शहरानजीकच्या टीआरपी येथील आदिनाथ नगर येथे राजस्थानी कामगरागाचा मृतदेह सापडून आला. ही घटना बुधवार ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वा. सुमारास उघडकीस आली.कैलास प्रभू सिंह (वय ३५, मूळ रा. राजस्थान सध्या रा. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
याबाबत एरंता सौदानसिंग मीना यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार केलास सिंह हा इतर तीन ते चार कामगरांसह त्यांच्या पतीकडे मार्बल बवण्याचे काम करत होता. बुधवारी सकाळी कैलासने इतर कामगारांना मी कामावर येत नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, दुपारी ३.३० वा. सुमारास आदिनाथनगर येथील गवताळ भागात एक तरुण बेशुध्द अवस्थेत पडल्याचे एरंता मीना यांना समजले. त्यांनी त्याठिकाणी जाउन पाहिले असता त्यांना तो कैलास सिंह असल्याचे दिसून आले. अधिक तपास पोलिस हेड कॉस्टेबल खापरे करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 09/Oct/2025














