चिपळूण : तालुक्यातील सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या सेवा पंधरवड्यात शाळा तिथे दाखला अभियान राबवण्यात आले. या अभियानात पाचवी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन दाखले काढून घेतले. शिबिरात उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलियर, डोमिसाईल दाखला, एसईबीसी, इडब्ल्यूएस, जातीचा दाखला अशा विविध प्रकारांचे दाखले वाटप करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 11/Oct/2025














