राजापूर : राजापूर रुग्णालयात गरोदर मातांसाठी मोफत सोनोग्राफी सुविधा सुरू करण्यात आली होती. त्याचा लाभ ४० गरोदर मातांना मिळाला आहे. या सुविधेमुळे तालुक्यातील सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्याचे आरोग्य सांभाळणाऱ्या राजापूर ग्रामीण रुग्णालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे, तरीही कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत.
राजापूर येथे अद्ययावत, अशा वैद्यकीय सुविधा देता याव्यात, यासाठी २००७साली शासनाने तीन कोटी रुपये खर्चुन शहरातील मुख्य रस्त्यालगत राजापूर ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत बांधली. शहरातील राजापूर हायस्कूलसमोर असलेले पूर्वीचे जुने ग्रामीण रुग्णालय, नव्या अद्ययावत इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले. मात्र, आजही या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 14/Oct/2025













