Ratnagiri : मिठाईत भेसळ केल्यास होणार कारवाई!

रत्नागिरी : दिवाळी सण अवघ्या काहीच दिवसांवर येवून ठेपला असून रत्नागिरीकर मोठ्या बाजारपेठेत प्रमाणात खरेदी करीत आहेत. सणासुदीत ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई मिळावी म्हणून अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. मिठाई तपासणीसाठी पथक असणार असून हे पथक शहर व जिल्ह्यातील मिठाई दुकानात जावून अन्नाचे नमुने घेणार आहेत. मिठाईमध्ये भेसळ आढळल्यास दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

सणासुदीच्या काळात ग्राहकांकडू मिठाई व इतर पदार्थ दूध, खवा, मावा, रवा, मैदा, आटा, खाद्य तेल, वनस्पती ३. मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. अन्न सुरक्षेविषयी कोणतीही घटना घडू नये म्हणून तसेच अन्न सुरक्षेची तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची विशेष मोहिम सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षितेतचा हाती घेतला आहे. दरम्यान, सणासुदीत भेसळ होणार नाही यासाठी दोन बैठका घेवून व्यावसायिकांना सूचना देण्यात दिल्या आहेत. दिवाळी सण काहीच दिवसांवर असून अत्र व औषध प्रशासनाच्या वतीने मिठाई, खवा, तेलासह विविध खाद्यपदार्थांवर करडी नजर असणार आहे. ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई मिळावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात अन्न व औषध विभागाने एकूण २० विशेष तपासण्या करून १६ अन्न नमुने मिठाई, खवा, खाद्य तेल, पनीर, पोहा, चिवडा घेण्यात आले आहेत. तसेच अन्न सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५ दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आली आहे. यात ३८ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. सणासुदीत १९६ अन्न परवाने तर ७७१ नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

तेल चांगल्या दर्जाचे हवे
दिवाळीसाठी विविध प्रकारचे फराळ करीत असतात, त्यासाठी काही दुकानदार तेल सामान्य वापरतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जर फराळासाठी निकृष्ट दर्जाचे तेल वापरल्यास त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी सर्व सूचनांचे पालन करावे. सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थाच्या सेवनामुळे विषबाधासारखी घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्न पदार्थांच्या दर्जाविषयी कोणतीही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा. – नितीन मोहिते, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

मिठाई ताजी विकणे गरजेचे
दिवाळीसणात मिठाईला मोठे महत्व असते. त्यामुळे ग्राहक विविध प्रकारची मिठाई खरेदीसाठी दुकानात गर्दी करतात. सणासुदीत मिठाईत भेसळ होण्याची शक्यता आहे. शिळी, निकृष्ट दर्जाची मिठाई मिळण्याची शक्यता असते. जरी बेस्ट बिफोरची नियमावली शिथील केली असली तरी दुकानदारांनी ग्राहकांना चांगली, ताजी मिठाई द्यावी, अशी मागणी वाढत आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा दुकानांची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी सामान्य रत्नागिरीकर करीत आहेत.

व्यावसायिकांनी ही दक्षता घ्यावी
परिसर किटकापासून संरक्षित व स्वच्छ करा
कच्चे अन्नपदार्थ नोंदणीकृत, परवानाधारक व्यावसायिकाकडून खरेदी करा – अन्नपदार्थ पंकिंग करताना वर्तमान पत्राचा वापर करू नये – मिठाई तयार करताना फूडग्रेड खाद्यरंगाचा अत्यल्प वापर करावा -बंगाली मिठाई २४ तासांच्या आत खाण्याचे स्पष्ट निर्देश – मिठाई बनवऱ्यांनी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व अॅप्रेंन वापरावे – पाणी पिण्यायोग्य वापरणे, पाण्याचा अहवाल प्राप्त करावा
-अन्न झाकूण ठेवावे, आजारी व्यक्तीने अन्नपदार्थ हाताळू नये

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:54 PM 15/Oct/2025