राजापूर : रायपाटण, टक्केवाडी येथील श्रीमती वैशाली शांताराम शेटे वय ७४ नामक महिला तिच्या राहत्या घरी अचानक मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान लांजा राजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस तपास सुरु झाला आहे.
दरम्यान श्वान पथकासह, फॉरेन्सिकची टीम आणि एल सी बी च्या पथकाला रायपाटण मध्ये पाचारण करण्यात आले आहे. सदर घटना रायपाटण, टक्केवाडी मध्ये घडली आहे. यातील आकस्मिक मृत्यू झालेली महिला श्रीमती वैशाली शांताराम शेटे वय ७४ या त्यांच्या घरी एकट्याच रहातात. अशी माहिती समोर आली आहे. यांना सोमवारी वाडीमधील ग्रामस्थांनी पहिले होते. अशी माहिती समोर आली आहे.
मात्र नंतर त्या काही दिसल्या नव्हत्या. त्यामुळे बुधवारी सकाळी वाडीतील एका महिलेने तिच्या घराचा दरवाजा ठोठावला असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर जोरात दरवाजा लोटला असता तो उघडला आणि आतील प्रकार समोर आला. त्यावेळी घरात श्रीमती वैशाली शांताराम शेट्ये या मृतावस्थेत आढळून आल्या. दरम्यान रायपाटण, टक्केवाडीत मोठी खळबळ उडाली. वाडीतील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. रायपाटण, पोलीस दूरक्षेत्रच्या पोलिसांना झाल्या घटनेची माहिती देताच पोलीस तेथे दाखल झाले. त्यानंतर मिळालेल्या माहिती वरून लांजा – राजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. एकूणच हा प्रकार लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीमसह एलसीबी आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 15/Oct/2025














