रत्नागिरी : ‘फेसबुक’वर तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील तरुणाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. याप्रकरणी जयगड पोलिसांत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जयगड पोलिसांत तक्रार अर्ज केला आहे. या पोस्टसंदर्भात फिर्यादी तालुकाप्रमुख राजेंद्र गोविंद शिंदे यांनी जयगड पोलिसांत तक्रार केली आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, फेसबुकवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक अपशब्द वापरले आहेत. त्याचा शिवसैनिक जाहीर निषेध करतो. तसेच अशी मागणी करतो की, समाजामध्ये तेढ निर्माण करणे व कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न निर्माण करणे यासाठी ‘त्या’ संशयित तरुणाविरुद्ध कडक कारवाई करावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 16/Oct/2025












