राजापूर : तालुका बौद्धजन संघ, राजापूर गट क्र. ३ यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ नोव्हेंबरला सकाळी १०:३० वाजता श्रावस्ती नगर, पाचल (ता. राजापूर) येथे होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयीची जागरूकता वाढविणे, तसेच भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांविषयी तरुण पिढीमध्ये अभिमान व जाण निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. ही स्पर्धा दोन गटांत होणार आहे. इयत्ता आठवी ते बारावीपर्यतच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या गटात पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे तीन हजार, दोन हजार आणि एक हजार, तसेच प्रत्येकी सन्मानचिन्ह आणि महाविद्यालयीन गटासाठी पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे चार हजार, तीन हजार, दोन हजार आणि प्रत्येकी सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.
वक्तृत्व स्पर्धेचा विषय संविधानाशी संबंधित असावा, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण नाव, जन्मतारीख, शाळा, महाविद्यालयाचे नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल आणि वक्तृत्व गट नमूद करून राजापूर तालुका बौद्धजन संघ, राजापूर गट क्र.३, मु. पो. पाचल, ता. राजापूर, जि. रत्नागिरी या पत्त्यावर अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 16/Oct/2025














