Diwali Festival | जिल्ह्यातील बाजारपेठा गजबजल्या..!

रत्नागिरी : दीपावली सणाच्या निमित्ताने नागरिक खरेदीसाठी रत्नागिरी शहरासह तालुक्यातील विविध बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. कपड्यांपासून ते विविध वस्तू खरेदी निमित्ताने घराबाहेर पडलेल्या नगारिकांच्या गर्दीन बाजारपेठा, मॉल, नामांकि कंपन्यांच्या दालनेशनिवार, रविवारसह विविध दिवशी बाजारपेठ गजबजत आहेत. दरम्यान, ग्राहकांच्या स्वागतासाठी सजलेली दुकाने, आकाशकंदील, दिवे, विद्युत रोषणाई यामुळे मारुती मंदिर, रामआळीसह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत उत्साह दिसून येत आहे. मोठ्याप्रमाणा नागरिक खरेदीसाठी आल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी होत आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवार रविवार दोन दिवससुट्यांमुळे शहरातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पगारसोबतच बोनसही दिला जात आहे. बाजारपेठेत गर्दी उसळत आहे. शुक्रवारपासून दिवाळी सण सुरू असल्यामुळे नागरिक बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू आहेत. विद्युत माळांची रोषणाई, रंगेबेरंगी आकाश कंदीलांनी बाजारपेठ नटली आहेत. यंदा जीएसटी बदलामुळे अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे नागरिकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

मुलांसाठी आकर्षक कपडे, तरुणाईसाठी टी शर्ट, जिन्स, शर्टस, कुर्ता, महिलांसाठी एकापेक्षा एक आकर्षक अशा साड्या, तरूणींसाठी विविध प्रकारचे पंजाबी, वेस्टर्न ड्रेस विक्रीस उपलब्ध झाले आहे. तसेच मुलांसाठी फटाके खरेदी करण्यात येत आहे. घर सजवण्यासाठी सजावटीचे साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.

ऑनलाईन खरेदीकडे वाढला कल
दिवाळीनिमित्त नागरिकांकडू कपडे, सजावटीचे साहित्यासह विविध वस्तू ऑनलाईन पध्दतीने खरेदी करण्यात येत आहे. विविध प्रकारच्या अॅपवर ऑनलाईन बुकिंग केली जात असून चार ते पाच दिवसात त्या वस्तू घरपोच मिळत आहेत. ऑनलाईन खरेदीकडे तरुणाईचा कल वाढला असल्याचे दिसून येत आहे.

एकापेक्षा एक मिठाई विक्री
दिवाळीनिमित्त एकापेक्षा एक मिठाई विक्रीस ठेवण्यात आली आहे. मोतीचूर लाडू, बर्फी, फराळाचे विविध साहित्य, गुलाबजामून, काजूकतली, साधे लाडू, चिवडा, बाकरवडी यासह विविध प्रकारचे मिठाई, ड्रायफ्रुट विक्रीस ठेवण्यात आले आहे. ड्रायफ्रूट, चॉकलेटचे तयार गिफ्टस ही विक्रीस ठेवले आहे. ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी करीत आहेत.

दिवाळीत होतेय करोंडेची उलाढाल
दिवाळीनिमित्त हिंदू बांधव कपड्यापासून सजावटीचे वस्तू, फटाके, मिठाई यासह मोबाईल, सोने, वाहन, जागा यासह विविध साहित्यांची खरेदी करीत असतात. यादिवाळीत बाजारपेठेत करोडोंची उलाढाल होत असते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:09 PM 17/Oct/2025