दापोली : हातामध्ये दारूची बाटली घेऊन मद्यधुंद अवस्थेत सापडलेल्या तरुणावर बुधवारी सायंकाळी तालुक्यातील केळशी समुद्रकिनारी दापोली पोलिसांनी कारवाई करण्यात आली. याबाबत कॉन्स्टेबल अविनाश करदेकर यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार विघ्नेश लक्ष्मण तळदेवकर (वय २७, रा. केळशी-कुंभारपाडा, दापोली) असे त्याचे नाव आहे. देशी दारू पीत असताना तो मद्यधुंद अवस्थेत सापडला. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 17/Oct/2025












