लांजा : गोठ्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीची कडी कोणत्या तरी हत्याराने उचकटून चोरट्याने आतील सोन्याचा हार चोरून नेला. या हाराची किंमत ९० हजार असून, ही चोरी तालुक्यातील इंदवटी-भगतेवाडी येथे १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीला आली. या प्रकरणी सुरेश चंद्रकांत भगते (वय ५८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा शेती आणि शिलाईचा व्यवसाय आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 17/Oct/2025














