Ratnagiri : वृद्धाची आजारपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील तरवळ माचिवलेवाडी येथील वृद्धाने आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते ३.४५ वा. कालावधीत घडली. शिवाजी दामा माचिवले (वय ७०, रा. तरवळ माचिवलेवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेत आयुष्य संपवलेल्या वृद्धाचे नाव आहे.

शिवाजी माचिवले यांना सुमारे २८ वर्षांपासून मेंदूला रक्त पुरवठा कमी होत असल्याचा आजार होता. त्या आजारावर रत्नागिरी आणि मुंबईतील डॉक्टरांकडे उपचार सुरु होते. परंतु, या आजारपणाला कंटाळून शिवाजी माचिवले यांनी घरात कोणीही नसताना घराच्या छताच्या लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेतला. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 20-Oct-25