रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे येथील वृद्धाने अज्ञात कारणातून घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. निलाप्पा सायबन्नाप्पा काळू (वय ७५, मूळ रा. अळूर, जि. उस्मानाबाद, सध्या रा. शांतीनगर नाचणे, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा प्रकाश निलाप्पा काळू यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.
त्यानुसार, सोमवारी प्रकाश काळू हे कामावर असताना त्यांच्या बहिणीने त्यांना फोन करून आपल्या वडिलांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या रामफळाच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचे सांगितले. प्रकाश काळू यांनी तातडीने घरी जाऊन पाहिले असता, त्यांना आपले वडील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांची कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे प्रकाश काळू यांनी वडिलांना खाली उतरवून आपल्या ओळखीच्या प्रदीप पाटील यांना याबाबत माहिती दिली. प्रदीप पाटील यांनी शहर पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 22/Oct/2025














