राजापूर : राजापुरातील तीन नागरिक गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहेत, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नागरिकांनी संबंधित व्यक्तींविषयी माहिती असल्यास ती जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरस्वती जयराम लाड (७० राहणार हसोळतळी, लाडवाडी ता. राजापूर) या सप्टेंबर २०२१ पासून नापत्ता झाल्या आहेत. त्यांची उंची ४ फुट ५ इंच, रंग गोरा, केस काळे पांढरे, बांधा-मध्यम, अंगात गुलाबी रंगाची नऊवारी साडी व गुलाबी रंगाच ब्लाऊज, गळ्यात काळ्या रंगाचा दोरा, उजव्या हाताच्या मनगटावर काळा डाग असे आहे.
सुभाष यशवंत सौंदळकर (३८ रा. आंगले सौंदळकरवाडी, ता. राजापूर) हे ९ ऑगस्ट २०२४ रोजी नापत्ता आहेत. शिक्षण- १० वी, जात-हिंदु कुणबी अंगाने सडपातळ, चहेरा – उभट, उंची ५ फुट ८ इंच, रंग सावळा, केस विरळ दाढी मिशी वाढलेली, अंगात राखाडी रंगाचे हाफ हाताचे टि शर्ट व राखाडी रंगाची हाफ पॅन्ट व पायात चप्पल, जवळपास मोबाईल नाही, भाषा मराठी, दारु पिण्याची सवय. पांडुरंग संभु सरवणकर (८६ रा. मु. पो. केळवली खालची हर्याण वाडी, ता. राजापुर) २९ मार्च २०२४ रोजी पासून नापत्ता झाले आहेत. वर्ण सावळा, उंची ५ फुट ६ इंच, केस -बारीक पिकलेले, दाढी पिकलेली, चेहरा उभट, दात पडलेले, अंगात हाफ सफेद रंगाचे टि शर्ट व नेसणीस सफेद रंगाची फूल पॅन्ट, पायात रेग्युलर चप्पल, हातात गोल्डन मनगटी घड्याळ, किशात आधार कार्ड आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 28/Oct/2025












