UBT : अमली पदार्थविरोधी तातडीने कारवाई व्हावी; उबाठा शिवसेनेची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे मागणी

चिपळूण : चिपळूणातील तरूणाई अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडत आहे. याबाबत तातडीने कारवाईची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांच्याकडे केली. शाळा व महाविद्यालय परिसरात काही युवकांकडून धूम स्टाईलने होत असलेल्या बेदरकारपणे वाहने चालवण्याचा मुद्दाही यावेळी तीव्रतेने मांडण्यात आला.
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांनी पोलिस विभागाकडून अंमली पदार्थ व वाहतूक नियम भंगाविरोधात अॅक्शन रोड मॅप तयार करण्यात आल्याची माहिती दिली. समाजाच्या सहकार्यानेच ही लढाई लढता येईल, असे सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या भेटीत शिवसेना चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, महिला विधानसभा क्षेत्र संघटिका रूमा देवळेकर, तसेच महिला शहर संघटिका वैशाली शिंदे यांनी तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी कडक पाऊले उचलावीत अशी मागणी उपविभागाय पोलिस अधिकारी बेले यांच्याकडे केली.

यावेळी तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका संघटिका मानसी भोसले, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये, उपतालुका संघटिका दीप्ती सावंतदेसाई, उपशहरप्रमुख संतोष पवार, विभागप्रमुख अजित गुजर, मनोज पांचाळ, तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे, युवती अधिकारी तीर्था लाड, शाखाप्रमुख माधवी दिवटे, शाखा संघटिका निखी साळुंखे, उपशाखा संघटिका सुहासिनी मुकादम, वैशाली मानकर, अनिता पिसे, विद्या महाडिक व सुनील सावंत देसाई उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 28/Oct/2025