पाली : पाली येथील बसस्थानकावर राजेंद्र रामचंद्र जांगळी चाफवली, (ता. संगमेश्वर,) यांचा मोबाईल चोरीला गेला. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ वाजताच्या दरम्यान ते मुंबईहून रत्नागिरीकडे येत होते. त्यावेळी ते पाली बस स्थानकावर थांबले होते. त्यानंतर राजापूर-रत्नागिरी एस.टी. बसमध्ये चढत असताना निळ्या रंगाचा आयफोन १३ मोबाईल चोरीला गेला.
घटनेनंतर त्यांनी पाली बस स्थानकावरील कंट्रोल रूममध्ये चौकशी केली असता त्यांनी तेथे सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांनी पाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. चोरी गेलेल्या मोबाईलमध्ये माझी महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे, फोटो व वैयक्तिक माहिती असल्याने मोबाईल शोधण्यात मदत व्हावी, जनजागृती व्हावी आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 28/Oct/2025












