चिपळूण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींसाठी एक महिना कालावधीचे विनामूल्य उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित केले आहे. दि. ३१ ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत हे प्रशिक्षण होणार आहे.
अनुसूचित जातीतील युवक-युवती, नवउद्योजकांना उद्योजकता विकासासंबंधी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय, स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करणे हा विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश आहे. किमान इयत्ता आठवी उत्तीर्ण असलेल्या युवक-युवतीला यासाठी प्रवेश मिळू शकेल.
तसेच वयोमर्यादा १८ ते ४५ वर्ष आहे. जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, छायाचित्रे आदी कागदपत्रे घेऊन ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत स्वामीकृपा कॉम्प्युटर, मुंबई-गोवा महामार्ग, चिपळूण येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहन रत्नागिरीतील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 28/Oct/2025












