देवरुख : संगमेश्वर तालुका तेली समाज सेवा संघातर्फे शुक्रवार, २४ रोजी देवरुख तहसीलदारांना निवेदन सादर करून तेली आणि ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
देवरुखचे प्रभारी तहसीलदार सुदेश गोताड यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठीचे हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघाचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष संतोष राहटे सचिव योगेश चव्हाण, महिला अध्यक्ष दीपिका किर्ते, उपाध्यक्ष पांडुरंग रहाटे, प्रांतिक महिला अध्यक्ष प्रिया भोपळकर, मधुरा भोपळकर, संतोष किर्ते, जनार्दन रहाटे, राजेश झगडे यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या मार्गदर्शनानुसार हे निवेदन देण्यात आले. दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी हैदराबाद गॅझेटियरवर आधारित मराठा-कुणबी प्रमाणपत्राबाबतचा शासन अध्यादेश रद्द करणे तसेच न्या. शिंदे समिती, मराठा व ओबीसी उपसमिती बरखास्त करणे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 28/Oct/2025













