राजापूर : तालुक्यातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा अवघ्या चोवीस तासात शोध घेण्यात राजापूर पोलिसांना यश आले. तिला नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. तालुक्यातून २८ वर्षीय तरुणी २५ रोजी सायंकाळी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. घरच्यांनी परिसरात आणि नातेवाइकांकडे शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिने दुसऱ्या दिवशी सकाळी एका महिलेच्या मोबाईलवरून घरी फोन करून सांगितले की, ती गोव्यात आहे आणि तिला घरी यायचे आहे.
काही वेळानंतर पुन्हा फोनवरून संपर्क साधत तिने पनवेलला निघाल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मोबाईल नंबरचे लोकेशन तपासले. त्यानंतर राजापूर रोड रेल्वेस्टेशनवर मांडवी एक्स्प्रेस आगमनावेळी सर्व बोग्यांची तपासणी केली. या वेळी ती तरुणी रेल्वेत बसलेली आढळून आली. तिला सुरक्षितपणे तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. हा तपास पोलिस उपनिरीक्षक मोबिन शेख, पोलिस कॉन्स्टेबल घोगले, उकार्डे, शेलार, भेडसे, एलएचसी वरक, होमगार्ड तेली, ताम्हणकर, सकपाळे यांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 29/Oct/2025













