Ratnagiri : मुरूगवाडा येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी : शहरातील मुरूगवाडा येथील तरुणाने लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

वैभव विलास पाटील (वय ३३, रा. मुरूगवाडा, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव याला बुधवारी (ता. २२) ला सकाळी नातेवाइकांनी मद्यपान करू नकोस, असे सांगितले. त्याचा राग त्याला आल्याने घराच्या वरच्या खोलीतील लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला. तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. उपचार सुरू असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 29/Oct/2025