Khed : धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

खेड : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाडीतून पडून गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख पटलेली नसून, त्याचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष इतकी आहे. ही घटना रविवारी रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान मौजे नातू तर्फ वावे येथे घडली.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे नातू तर्फ वावे येथे रेल्वे रुळावर ३० ते ३५ वर्षाचा अनोळखी पुरुष पडलेला दिसला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. तो कोणत्या तरी रेल्वेतून पडून जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत खेड पोलिस स्थानकात मृत्यूची नोंद केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 29/Oct/2025