Rajapur : दोनिवडे येथील बीएसएनएल टॉवर सुरू करण्याची मागणी

पाचल : राजापूर तालुक्यातील दोनिवडे येथे भारत संचार निगमतर्फे (बीएसएनएल) एक वर्षांपूर्वी टॉवर उभारण्यात आला होता. मात्र, तो कार्यान्वित झालेला नाही. हा टॉवर सुरू करा. अन्यथा, आंदोलन करू, अशी भूमिका दोनिवडे येथील सहयोग प्रतिष्ठानने घेतली आहे. संघटनेतर्फे भारत संचार निगमच्या रत्नागिरीतील व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 29/Oct/2025