रत्नागिरी : खेडशी येथील शिवशक्ती ग्रुपने खांदेरी-उंदेरी किल्ल्याची प्रतिकृती हुबेहूब साकारली आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासाचे आणि वैभवशाली दुर्गसंस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी अभेद्य ‘जलदुर्ग’ खांदेरी उंदेरी साकारला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या आणि अनेक सागरी लढायांचे साक्षीदार ठरलेल्या खांदेरी-उंदेरी किल्ल्याचा हा देखावा रत्नागिरीकरांना आवडला आहे. शिवशक्ती ग्रुपच्या तरुणांनी बारकाईने किल्ल्याचे बांधकाम, तटबंदी आणि ऐतिहासिक महत्त्व विचारात घेऊन ही प्रतिकृती तयार केली आहे. रात्रीच्यावेळी आकर्षक रोषणाईमुळे हा देखावा अधिकच विलोभनीय दिसतो. खेडशीनाका येथील खेडशी हायस्कूलसमोर (मोरेश्वर हॉटेलच्यामागे) ही प्रतिकृती साकारली असून, अनेकजण पाहण्यासाठी येत आहेत.
ही कलाकृती पाहण्याची संधी त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत उपलब्ध आहे. दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत शालेय विद्यार्थी, तरुणांनी यावे, असे आवाहन शिवशक्ती ग्रुपने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 30/Oct/2025













