Sangameshwar : कोंडगाव येथे मटका जुगारावर छापा

रत्नागिरी : कोंडगाव (ता. संगमेश्वर) येथे मटका जुगारावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत साहित्यासह १ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवरूख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेंद्र गोपाळ सकपाळ (वय ५७, रा. साखरपा-सखपाळवाडी, ता. संगमेश्वर) असे त्या संशयिताचे नाव आहे.

ही घटना मंगळवारी (ता. २८) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कोंडगाव आझाद मैदान रोडलगत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित विनापरवाना मटका जुगार चालवत असताना सापडला. त्याच्याकडील साहित्यासह १ हजार १२५ रुपये पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल मनस्वी पावसकर यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 30/Oct/2025