खेड : तालुक्यातील मौजे बोरज येथे दुपारच्या सुमारास घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वा.च्या सुमारास घडली.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२७/२०२५ भादंवि अधिनियम २०२३ चे कलम ३३१ (३), ३०५ (अ), ३(५) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संदीप बाळकृष्ण जाधव (५०, रा. बोरज, सुरभी गार्डन, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चुलते प्रकाश मुलु जाधव यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाज्याचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या घरफोडीत महेंद्र राजाराम प्रिदाणकर (रा. मोरवंडे, कुभांरवाडी, ता. खेड) आणि त्याच्यासोबतच्या अनोळखी इसमाने घरातील कपाट उचकटून त्यामधील ५० नोटा (५०० रुपयांच्या) असे एकूण २५ हजार रुपये चोरून नेल्याचे फिर्याद दिली. या घटनेचा अधिक तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी परिसरात शोध सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 31/Oct/2025












