रत्नागिरी : तालुक्यातील देवूड चाटवळवाडी फाटा येथील चिरेखाणीजवळ बेकायदेशिरपणे मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१५ वा. सुमारास करण्यात आली. अनिल गणपत कळंबटे (४४, रा. करबुडे मुळगाववाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात महिला पोलिस हेड कॉस्टेबल प्रिया सुर्वे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी संशयित हा चिरेखाणीजवळ आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना समोर देशी दारुची बाटली ठेवून पिण्याच्या उद्देशाने बसलेला मिळून आला. दुसऱ्या घटनेत जयगड येथील वाटद खंडाळा न्यू इंग्लिश स्कूल समोर मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिकाजी महादेव वासावे (६०, रा. जांभारी वासावेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल रवींद्र आठवले यांनी तक्रार दिली आहे. या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 31/Oct/2025












