रत्नागिरी : तालुक्यातील जांभारी येथे चुलीवर चुल पेटवत असताना वृद्धा भाजली. तिला वाचवण्यासाठी गेलेला तिचा मुलगा ही भाजला आहे. अधिक उपचारासाठी दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वा. सुमारास घडली.
फातिमा अब्दुल रहिमान पागारकर (८८) व असल्म पागारकर (रा. जांभारी, ता. जि. रत्नागिरी) अशी त्यांची नाव आहे. गुरुवारी सकाळी फातिमा या घरातील चुलीवर पाणी तापवण्यासाठी चूल पेटवत होत्या. चुलीत त्यांनी कागद, प्लास्टिक टाकून चूल पेटवली असता अचानक आगीचा भडका उडाला. फातिमा यांच्या अंगावरील नायलॉनच्या साडीने पेट घेतला यामध्ये ती ६० टक्के भाजली. तिचा आरडाओरडा ऐकून तिचा मुलगा अस्लम पागाकर तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे दोन्ही हात भाजले आहेत. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 31/Oct/2025












