Ratnagiri : कुवारबाव परिसरात विजेचा खेळखंडोबा

रत्नागिरी : गेले सुमारे दीड दोन महिने रत्नागिरीतील साळवी स्टॉप, जे. के. फाईल्स, नाचणे, एमआयडीसी, कुवारबाव परिसरातील नागरिक वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याने त्रस्त झाले आहेत. दरदिवशी केव्हाही अनिश्चित काळासाठी वीज गायब होते.

त्यासंबंधी फोनवर तक्रार करायची तर वीज गेल्याबरोबर लगेच फोन व्यस्त लागतो, तो वीज येईपर्यंत लागतच नाही. अगदी नवरात्र, दिवाळी अशा सणासुदीच्या काळातही विजेचा खेळखंडोबा सुरूच होता. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्यापूर्वीच यात लक्ष घालून सुधारणा करावी, ही अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 01/Nov/2025