रत्नागिरी, दि. 1 : कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ १०६४ वर संपर्क करा.
दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ च्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अविनाश पाटील, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, (मो. क्र. ७५८८९४१२४७), मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक, लाप्रवि,, (मो. क्र. ९८७०४७४५३५), सुहास रोकडे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, (मो. क्र. ९०६७०३५९१०) यांना संपर्क साधावा अथवा acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर acbmaharashtra.net येथे किंवा ई-मेल आयडी acbratnagiri@gmail.com, dyspacbratnagiri@mahapolice.gov.in, फोन नं. ०२३५२-२२२८९३ आणि टोल फ्री क्रमांक १०६४ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.
नगर पंचायत दापोली, तहसिलदार कार्यालय दापोली, तसेच तहसिलदार कार्यालय गुहागर या कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अधीक्षक अविनाश पाटील व पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र दापोली, सेतु कार्यालय, उप कोषागार कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय दापोली, उप जिल्हा राणालय दापोली, दापोली बाजारपेठ दापोली पोलीस ठाणे, दापोली बस स्थानक, दाभोळ धोपावे फेरीबोट, बसस्थानक गुहागर, सार्वजनिक बांधकाम विभाग गुहागर, सेतु कार्यालय, उप कोषागार कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय येथील कर्मचारी तसेच कार्यालयाचे परिसरात उपस्थित नागरिक यांना भ्रष्टाचार निर्मलताबाबत माहिती देवून लाचखोर अधिकारी/ कर्मचा-यांविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्याबत आवाहन करण्यात आले.
स्थानिक वृत्तपत्र, केबल टिव्ही व आकाशवाणीव्दारे भ्रष्टाचार विरुध्द जनजागृती पर संदेश प्रसारीत करण्यात आले. तसेच सोशल मिडीयाव्दारे व्हॉटसअप ग्रुपवर भ्रष्टाचार विरुध्द जनजागृती पर संदेश प्रसारीत करुन तक्रारीकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांचेकडील फोन नं. ०२३५२-२२२८९३ आणि टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकाबाबत जनजागृती करण्यात येत आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 01-11-2025














