Marine Fisheries : सागरी मासेमारीची होणार गणना

रत्नागिरी : देशातील सागरी मत्स्य व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून ‘५वी राष्ट्रीय सागरी मासेमारी गणना २०२५’ हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. ही गणना ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या महाराष्ट्रातील ७ सागरी जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. येथे सागरी मत्स्य व्यवसायाशी संबंधित घरांची, नौकांची आणि सुविधांची तपशीलवार माहिती संकलित केली जाणार आहे. देशातील सर्व किनारपट्टी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गणना होणार आहे.

राष्ट्रीय सागरी मासेमारी गणना उपक्रमाची अंमलबजावणी मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि या दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्यावतीने करण्यात येत आहे. आयसीएआर केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (सीएमएफआरआय) ही प्रमुख संस्था म्हणून कार्यरत आहे. या गणनेत फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया (एफएसआय) या संस्थेचे सहकार्य घेतले गेले आहे. येथील मत्स्य विभागाने ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय सागरी मत्स्यिकी संशोधन संस्थेच्या केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्था आणि राज्य सरकारांच्या संयुक्त विद्यमाने ही पाचवी सागरी मत्स्य जनगणना २०२५ ची महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. ही जनगणना केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरती मर्यादित नसून, सागरी मात्स्यिकी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशी सखोल माहिती जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे.

प्रथमच डिजिटलचा वापर
सागरी मात्स्यिकी जनगणनेच्या इतिहासात प्रथमच माहिती गोळा करण्यासाठी अत्याधुनिक ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. या व्यासपीठाद्वारे आर्थिक स्थिती, विविध उपजीविका आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती जमा केली जाईल. या जनगणनेच्या कार्यवाहीचा प्रारंभ ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ या काळात होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 01/Nov/2025