Ratnagiri, BJP: कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरीत भारतीय जनता पार्टी शहर च्या वतीने मोफत सरबत व पाण्याचे वाटप

रत्नागिरी : कार्तिकी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने भाविकांसाठी मोफत कोकम सरबत व पाण्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ८१०० भाविकांना सेवा देण्यात आली.

या उपक्रमात भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, शहराध्यक्ष श्री. परशुराम (दादा) ढेकणे यांच्यासह सोनाली केसरकर, निलेश आखाडे, संदीप सुर्वे, संतोष सावंत, समीर वस्ता, केतन कडू, सिद्धेश कडू, सचिन गांधी, गुरुप्रसाद फाटक, अमित विलणकर, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, प्रसाद बाष्ट्ये, मुक्ता बाष्ट्ये, तुषार देसाई, विनय मसुरकर, सौ. मसुरकर, कामना बेग, प्रणाली रायकर, सुप्रिया रसाळ, प्रवीण रायकर सिद्धेश नाईक प्रवीण ढेकणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भाविकांची सेवा हेच आमचे कर्तव्य असून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला, असा संदेश आयोजकांकडून देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:43 03-11-2025