National Railway Mazdoor Union : नॅशनल रेल्वे मजदूरची रत्नागिरीत १२ नोव्हेंबरला सभा

चिपळूण : नॅशनल रेल्वे मजदूर युनियनची ७१ वी सभा रत्नागिरी येथे १२ नोव्हेंबरला होणार आहे. संघटनेचे १५०० हून अधिक सभासद उपस्थित राहणार असल्याची माहिती या संघटनेचे चिपळूण तालुकाध्यक्ष संजय गुजर यांनी दिली. या निमित्ताने १२ ते १४ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस अधिवेशनही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्य करणारी एक प्रमुख बिगर राजकीय संघटना आहे. या संघटनेची स्थापना १९५४ ला झाली. ही संघटना ऑल इंडिया रेल्वे फेडरेशन हिंद मजदूर सभा यांसारख्या अराजकीय महासंघासोबत संलग्न आहे. रेल्वे कर्मचारी, मध्य रेल्वेमध्ये कार्यरत हंगामी कर्मचारी यांना संघटित करणे आणि त्यांच्या न्याय व हक्कासाठी लढण्याचे कामही संघटना करते त्याशिवाय संघटनेने आपत्कालीन काळात लोकांची वेगवेगळ्या पद्धतीने मदतही केली आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठे रक्तदान शिबिराचे आयोजन संघटनेकडून करण्यात आले होते. कोकण रेल्वेमध्ये आमची संघटना एकमेव मान्यताप्राप्त संघटना आहे. १२ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सभा होईल. सभेला महामंत्री वेणू पी. नायर मार्गदर्शन करणार आहेत. १३ आणि १४ नोव्हेंबरला वेगवेगळ्या शिष्टमंडळाबरोबर खुली चर्चा करण्यात येणार आहे. ही चर्चा सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 03/Nov/2025