खेड : येथील नाट्यगृहात आयोजित नाट्यप्रयोगावेळी नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा एसी नीट चालत नसल्यामुळे नाट्यगृहातील नाट्यप्रेमींचां संताप अनावर झाला. प्रयोग सुरू व्हायला एक तासापेक्षा अधिक वेळ गेल्याने नागरिकांनी आमचे पैसे परत द्या, अशा घोषणा दिल्या. यावेळी आयोजकांनी असमर्थता दर्शवली. त्यानंतर थोडा वेळ वातानुकूलित यंत्रणा सुरु होत होती व नंतर बंद पडत होती. अशा परिस्थितीत नाटक संपवण्यात आले.
खेडमधील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा पडदा अनेक वर्षांनी माजी मंत्री रामदास कदम आणि ना. योगेश दादा कदम यांच्या अथक प्रयत्नांतून उघडला. त्याबद्दल खेडवासीय समाधानी आहेत. संपूर्ण नवीन रूपात व सर्व सोयीने युक्त आधुनिक नाट्यगृह खेडवासीयांना त्यांच्या माध्यमातून मिळाले. या नाट्यगृहात तिकीट लावून भाऊ कदम या सुप्रसिद्ध कलाकाराचा नाटकाचा पहिला प्रयोग झाला. या प्रयोगासाठी खेडवासीयांनी उदंड प्रतिसाद देऊन नाटक हाउसफुल्ल झाले होते.
मात्र, सर्व रसिक प्रेक्षकांच्या पदरी निराशा पडली. वातानुकूलन यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती आणि त्यामुळे नियोजित वेळेच्या सुमारे एक तासानंतर ही कार्यक्रम सुरू होऊ शकला नाही. तोपर्यंत सर्व प्रेक्षक विना एसी व पंख्याशिवाय अक्षरशः घुसमट होऊन सर्वजण अस्वस्थ झाले होते.
याबाबत खेडमधील सामाजिक कार्यकर्ते अभियंता रवी उदय जाधव यांनी तेथे उपस्थित असणाऱ्या न.प. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करून जाब विचारला. काही वेळात अडचण दूर होईल, असे सांगण्यात आले. तथापि विचारणा केल्यानंतर नियोजित वेळेपेक्षा एक तासानंतर उशिरा नाटक सुरू झाले. परंतु एसी मात्र सुरू होऊ शकले नाहीत. संपूर्ण नाटक एसी आणि पंख्याशिवाय सर्वांना पहावे लागले. नाटकाचे संयोजक व आयोजक आणि कलाकार यांनाही त्रास सहन करावा लागला. नाट्यगृह देताना नगरपालिका प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसे न झाल्यामुळे सर्वांना त्रास सहन करावा लागला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 04/Nov/2025














