राजापूर : बंदरामध्ये उभ्या असणाऱ्या बोटीचा रोप अचानक तुटून तो खलाशाला लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील साखरी नाटे जेटीवर शुक्रवारी (७ नोव्हेंबर) दुपारी घडली. राम लखन चौधरी (वय २५, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. साखरी नाटे, राजापूर) असे त्याचे नाव आहे.
राम चौधरी हा ऑगस्ट २०२५ पासून फैरोज हुसेन भाटकर याच्या बोटीवर खलाशी म्हणून काम करत होता. ते आणि त्याच्या सोबत अन्य ४ ते ५ खलाश शुक्रवारी दुपारी साखरी नाटे जेटीवर उभहोते. याठिकाणी एका बोटीचा रोप् अचानक तुटला. हा रोप राम चौधरी याला लागून त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 11/Nov/2025













